गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

शिकारीसाठी वनविभागात येणाऱ्या युवकांना अटक

शिकारीसाठी वनविभागात  येणाऱ्या युवकांना अटक 

वरोरा 
चेतन लूतडे 

 वरोरा तालुक्यातील मौजा महालगाव (खु.) कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये दिनांक 13/02/2025 रोजी रात्रौ 09.30 वाजताचे दरम्यान वनकर्मचारी गस्त करीत असताना संशयास्पद युवकांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ शिकारीचे साहित्य आढळल्याने वनविभागात शिकारीच्या दृष्टिकोनातून आलेले युवक यांना वनविभागाने अटक केली आहे व त्यांचे साहित्य जप्त केले आहे.

वनविभागाचे अधिकारी एस. के. शेडे वपअ वरोरा, डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, ब्रम्हणाथ वनरक्षक रामपुर, रोजनदारी वनमजुर व पि.आर.टी. टिम रात्रीच्या वेळेस गस्त करीत असतांना आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल सर्व राहणार हिरापुर पो. कोसरसार ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर व संदिप बालीकचंद्र शेरकुरे रा. धोपटाळा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर है कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये संक्षयास्पद अवस्थेत आढळुन आले होते. त्यांच्याकडे शिकारीसाठी लागणारी साहित्य आढळून आले त्यामुळे या सर्वांना वनविभागाच्या कायद्यानुसार अटक करण्यात आली.

युवकांची  विचारणा केली असता ते वन्यप्राण्याची शिकार करण्याकरीता आल्याचे सांगितले. त्यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य वाघुर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन, मोबाईल जप्त करण्यात आले. वनविभागाच्या  भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 2(16) व 51 अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपींना त्याब्यात घेऊन कोर्ड विद्र‌द्यमान प्रथम श्रेणी न्यायलय वरोरा येथे दिनांक 14/02/2025 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले.

पुढील चौकशी व्हि. श्री. तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुडी, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्हि. वेदांती वनरक्षक महालगाव, करकाडे, केजकर, ब्रम्हनाथ वनरक्षक करीत आहे.

Comments