वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होणार**आ. सुधीर मुनगंटीवार

*मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होणार*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून बैठकीत मिळाला सकारात्मक प्रतिसाद*

*मुलसह पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार लाभ*

अकूंश अवथे चंद्रपूर 

*चंद्रपूर - मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला. आता लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.*

वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा. यासाठी जिल्ह्यातील मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. यासंदर्भात मंगळवार, दि. ७ जानेवारीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे झालेल्या या बैठकीत तंत्रनिकेतन महाविद्यालयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना व निर्देश दिले. महाविद्यालयासंदर्भात वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आ. श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांचे आभार मानले आहेत.चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

*आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश*
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.

*या विद्यार्थ्यांना होणार लाभ*
या उपक्रमामुळे मूलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. मुल येथे यापूर्वीच शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे. शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Comments