लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*एनएफडीपी पोर्टलवर मच्छिमार व मत्स्यव्यवसायिकांची नोंदणी*

*एनएफडीपी पोर्टलवर मच्छिमार व मत्स्यव्यवसायिकांची नोंदणी*

अंकुश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 27 : जिल्ह्यातील  सर्व वैयक्तिक मच्छिमार/मत्स्यसवंर्धक/ प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेचे लाभार्थी तसेच सर्व मच्छिमार  सहकारी संस्था /   FFPOS    यांना कळविण्यात येते की, मत्स्यव्यवसाय विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याकरिता / अर्थसहाय्य मिळणेसाठी नॅशनल फीशर डिजिटल प्लेटर्फाम    (NFDP)  वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सदरची नोंदणी https:// NFDP.dof.gov.in  या लिंकवर स्वत: किंवा नजीकच्या CSC केंद्रात आधार कार्ड, बॅक पासबुक सह जाऊन विनामुल्य करता येईल. तसेच ई–श्रम कार्ड साठीची नोंदणी https://eshram.gov.in  या लिंकवर करावी. अपघात गट विमा (GAIS) नोंदणीबाबतची 31 कॉलमची माहिती तसेच K.C.C  बाबतची  माहिती सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय,  प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, क्र. 11, येथे सादर करावी, असे जिल्हा मत्स्यविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

Comments