लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

गजानन महाराज मंदिर टागोर नगर येथे भव्य जागतिक पारायण सोहळाचे आयोजन .

 गजानन महाराज मंदिर टागोर नगर येथे भव्य जागतिक पारायण सोहळाचे आयोजन .  
  
वरोरा 
अनिल नौकरकार 
     
वरोरा येथील संत गजानन महाराज मंदिर टागोर नगर अभ्यंकर वॉर्ड 12 जानेवारीला भव्य जागतिक पारायण सोहळा पार पडला.                       
जागतिक शांतता ,स्त्री सशक्तिकरण, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि सकल मानव जातीच्या कल्याणाकरिता गजानन महाराजांची कृपा प्राप्त करणे या उद्देशाने एकाच दिवशी एकाच वेळी जगभरातील श्री गजानन महाराजांच्या भक्तांनी जागतिक पारायण करून विजय ग्रंथाचे वाचन करावे यासाठी 12 जानेवारीला येथील टागोर नगर मधील संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जागतिक पारायण दिनाचे आयोजन करण्यात आले श्री संत गजानन महाराज शेगाव भक्त परिवाराचे सन 2013 पासून श्री संत गजानन महाराजांचे विजय ग्रंथाचे भव्य जागतिक पारायण कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसरा रविवार हा जागतिक पारायण दिवस पाळण्याचे निश्चित करण्यात आले यानुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज मंदिर टागोर नगर येथे जागतिक पारायण दिवसाचा सोहळा संपन्न झाला यावेळी सौ अनिता नौकरकर, दिशा कावटी, माधुरी सातभाई, सुनिता खीरटकर, संगीता बाळबुदे स्वाती वानखेडे सुनिता खापणे ललिता बोथले,ज्योती डाहूले,सौ.बावणे काकू  आधी सह 251 महिला व पुरुषांनी विजय ग्रंथाचे पारायण केले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन कमिटीचे नितीन नक्षीने अनिल बाळबुदे अशोक रोकडे सुरेश आगबतनवार यासह सर्वांनी परिश्रम घेतले.
------------------------------

Comments