लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*रोटरी क्लब वरोरा तथा शेषरत्न बहुउद्देशीय संस्था तर्फे ८ डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिर*

*रोटरी क्लब वरोरा तथा शेषरत्न बहुउद्देशीय संस्था तर्फे ८ डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिर*


वरोरा : - येथील शेषरत्न बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब तर्फे रविवार दि.८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सरकारी रक्तपेढी चंद्रपूर  यांच्या मार्फत डोंगरवार चौकातील महावीर भवन येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत रक्तदान शिबीर आयोजित होणार आहे.
काही महिन्यांपासून चंद्रपूर, वर्धा, नागपूर या शहरातील सरकारी तसेच खाजगी रक्तपेढी मधे  २० ते २५  टक्के  रक्तच उपलब्ध होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शैषरत्न बहुउद्देशीय संस्था वरोरा आणि रोटरी क्लब वरोरा यांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही संस्थेच्या वतीने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी स्वतःचे कर्तव्य समजून  पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू, डिलिव्हरी रुग्णां सोबतच अपघात ग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. यामुळे सदर  शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन *धिरज लाकडे* अध्यक्ष शेषरत्न बहुउद्देशीय संस्था व *बंडु भाऊ देऊळकर* अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ वरोरा यांनी केले आहे.

Comments