लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

कु.अक्षता पोहाणे सीए परीक्षेत उत्तीर्ण.

कु.अक्षता  पोहाणे  सीए परीक्षेत उत्तीर्ण.
वरोरा 
फक्त बातमी 

(वरोरा)चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील अक्षता प्रकाश (हरिहर) पोहाणे हिने २६ डिसेंबर २०२४ रोजी  जाहीर झालेल्या निकालात सनदी लेखापाल (सीए ) फायनल परीक्षा उत्तीर्ण केली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अक्षताचे वडील व्यावसायिक असून, आई गृहिणी आहेत. कु.अक्षता हिने आपले दहावी - बारावी शिक्षण वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत पदवी घेतली होती . त्यासोबत सीए अभ्यासक्रमाची तयारी   नागपूरमध्ये राहून पूर्ण केली.
परिणामाची कुठलीही तमा न बाळगता केलेल्या अथक परिश्रमातून व संघर्षातून यशस्वी वाटचाल करत तिने हे यश प्राप्त केले. कु.अक्षताच्या यशात त्यांचे पालक मुख्य आधारस्तंभ ठरले. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि विश्वासामुळे अक्षता ने आत्मविश्वास ठेवून परीक्षा दिली. याच आत्मविश्वासामुळे  परीक्षेत यशस्वी होऊ शकली. या यशाचे श्रेय तिने तिच्या गुरुजनांना, पालकांना दिले आहे. कु.अक्षता ने मिळवलेले  यश  कुटुंबासाठी आणि वरोरा शहरासाठी अभिमानास्पद आहे. तिच्यावर मित्र परिवारातर्फे शुभेच्छांचा चा वर्षाव होत आहे.

Comments