वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडले.

वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडले

शेंबळ गावाजवळ घटना 

वरोरा
वरोर्‍यावरून शेंबळ येथील नातेवाईकाच्या भेटीला जात असलेल्या दुचाकीस्वारला भरधाव वेगात असलेल्या हेक्टोर कारने जबर धडक दिली. यात दुचाकी स्वराचा जगीचा मृत्यू झाल्याची घटना वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील शेंबळ गावाजवळ दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. प्रवीण रामकृष्ण वाभीटकर (45) रा. वरोरा असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार वरोरा शहरातील कापड व्यावसायिक प्रवीण वाभीटकर हे शेंबळ येथे राहत असलेल्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी हीरो होंडा दुचाकी क्रमांक एमएच 34 एसी 2839 ने जात असताना शेंबळ गावाच्या वळणावर वणी कडून वरोरा कडे येत असलेली  भरधाव हेक्टोर कार क्रमांक एमएच 29 बीपी 7722 या वाहनाने  दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार प्रवीण वाभीटकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळ वरुन कारचालक पसार झाले होते. प्रवीण वाभीटकर यांच्या पश्चात पत्नी, व तीन अविवाहित मुली आहे. घरचा करता व्यक्तीच गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

अल्पावधीत तयार करण्यात आलेल्या  या वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कोणतीही उपाययोजना केल्या गेली नाही. स्पीड लिमिट बोर्ड, ब्लिंकर लाईट, रिप्लेक्टर रेडियम ब्लॉक सह आदी त्रुट्या असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. 

Comments