वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ**आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल

*धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*

*आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल*

*राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा*

*शेतकरी बांधवांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार*

अकूंश अवथे चंद्रपूर 

*चंद्रपूर, दि. १३ : खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.*

पोर्टलवरील नोंदणीसाठी दि. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नोंदणी केंद्रावरील गर्दीमुळे नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. शेतकरी धान खरेदी नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी मुदतवाढ देण्याची शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थानी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार मागणीची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिवांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली. तात्काळ दखल घेत काही तासातच शासनाचे अवर सचिवांनी नोंदणीकरीता दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे मागणीची तात्काळ दखल घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करत काही तासातच मुदतवाढ मिळाल्याबद्दल शेतकरी बांधवांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

Comments