वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

*राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 16 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली 14 डिसेंबर 2024 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये घेण्यात आलेल्या  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये  1,159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. 
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबित 8,405 न्यायालयीन प्रकरणे व दाखलपूर्व 16,414 प्रकरणे  ठेवण्यात आली होती. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 640 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 519 अशी एकूण 1159 निकाली काढण्यात आली. 
प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 2 कोटी 90 लक्ष 70 हजार रुपये वसुल करण्यात आले. तर धनादेश प्रकरणांपैकी 96 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार न्यायालयातील 2 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 
चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.

Comments