गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

सत्ता परिवर्तनाच्या लढाईत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा. - सचिन पायलटभद्रवती येथे जाहिर सभेचे आयोजन

सत्ता परिवर्तनाच्या लढाईत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा. - सचिन पायलट
भद्रवती येथे जाहिर सभेचे आयोजन

फक्त बातमी 

महायुती सरकार च्या काळात भ्रष्टाचार फोपावला असून महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी चे सरकार आणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सचिन पायलट यांनी केले आहे.

भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राजस्थान चे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. सभे दरम्यान आपले मत व्यक्त करताना सचिन पायलट म्हणाले कि, महाराष्ट्र हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे राज्य असून या ठिकाणी धर्म निरपेक्ष सरकार म्हणून महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवाराला निवडणून आणणे हे आपली जबाबदरी आहे. वरोरा विधानसभेतील उमेदवार प्रवीण काकडे हे जनसामान्यांचे नेतृत्त्व करणारे उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे. विकासातील सातत्य व भविष्यातील विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरीता महाविकास आघाडीने आपल्या समोर योग्य उमेदवारी दिली आहे. तरी आपण यांच्या पाठाशी राहून या विधानसभेत पुन्हा एकदा विक्रम घडवावा असे आवाहन यावेळी सचिन पायलट यांनी केले आहे. महायुती सरकार च्या काळात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार वाढले असून भ्रष्टाचार देखील फोपावला आहे. राज्यातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे. राज्यातील विकासाचे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करुन सत्ता परिर्वनाच्या लढाईत आपला सहभाग नोंदवावा, असे मत देखील यावेळी सचिन पायलट यांनी केले. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, यांसह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments