वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*शिरना नदीघाटावर सूर्याला अर्ध्य वाहून माजरी येथे छटपूजा उसवाची सांगता*

*शिरना नदीघाटावर सूर्याला अर्ध्य  वाहून माजरी येथे छटपूजा उसवाची सांगता*

अतुल कोल्हे भद्रावती :-
         तालुक्यातील माजरी  येथील शिरना नदी घाटावर उगवत्या सूर्यास अर्ध्य  वाहून माजरी येथे छटपूजा उत्सवाची मोठ्या उत्साहात  सांगता करण्यात आली. चार दिवस चाललेल्या या उत्सवात महिलांव्दारे करण्यात आलेले व्रत व उपवास सांगता दिनी सोडण्यात आले.तालुक्यातील माजरी  येथे उत्तर भारतीय नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने येथे छटपूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.छटपूजेच्या सांगता दिवशी शेकडो महिलांनी येथील शिरना नदीवर सकाळी सूर्याला अर्ध्य  देण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे शिरना नदी घाट भाविकांनी फुलून गेला होता. उत्सवाच्या पहिल्या दिवशी नहाय खाऊन उत्सवाची सुरुवात करण्यात आली व शिरना नदीत पवित्र स्नान करण्यात आले. या काळात महिलांनी व्रत व उपवास ठेवला. तिसऱ्या दिवशी नरजला व्रत पाळण्यात आले व सूर्याला सूर्यास्ताचे वेळी अर्ध्य  वाहण्यात आले. तर चौथ्या दिवशी सकाळी सहा वाजता उगवत्या सूर्याला अर्ध्य  वाहून  उत्सवाची मोठ्या ऊत्साहात सांगता करण्यात आली.

Comments