वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*गोंडवाना गणतंत्र पक्षाचे रमेश मेश्राम यांच्या उमेदवारी अर्ज अपात्रतेमुळे राजकीय समीकरण बिघडले*रमेश मेश्राम गेम चेंजर ठरतील.

*गोंडवाना गणतंत्र पक्षाचे रमेश मेश्राम यांच्या उमेदवारी अर्ज अपात्रतेमुळे राजकीय समीकरण बिघडले*

रमेश मेश्राम गेम चेंजर ठरतील. 

वरोरा 3/11/2024
चेतन लुतडे 

मागील 2019मधील निवडणुकीमध्ये  सहा हजाराच्या वर  मतदान घेतलेले गोंडवाना गणतंत्र पक्षाचे झुंजार नेतृत्व रमेश मेश्राम यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने विधानसभेमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उत्थान आले आहे. 

मागील पाच वर्षात भद्रावती, वरोरा क्षेत्रात प्रामुख्याने आदिवासी समाजा हितासाठी  आंदोलन, मोर्चे, बेरोजगारांसाठी लढा उभारला , समाजात प्रबोधन मेळावे, समाजातील लोकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरुध्द प्रकरणे हाताळून आंदोलने अशा अनेक सामाजिक कार्यातून आदिवासी समाजात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले.  त्यामुळे त्यांचा वाढता जनसंपर्क बघून यावेळेस ते चांगल्या प्रकारे मतदान घेऊन चांगल्या चांगल्याना या निवडणुकीत टक्कर देतील अशी चर्चा या निवडणुकीत जनसामान्य लोकांमध्ये होती. परंतु अचानक यांच्या उमेदवारी अर्ज अपात्रतेमुळे राजकीय राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. राजकीय समीकरणे बिघडले असल्याचे चित्र  विधानसभेमध्ये स्पष्ट दिसत आहे. 
वरोरा प्रतिनिधी यांनी रमेश मेश्राम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनीं सांगितले की, निवडणुक अधिकारी यांनी मला उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याबाबत कसलेही तोंडी सूचना दिलेली नव्हती मला वाटल की माझा अर्ज पात्र ठरला परंतु दुसऱ्यादिवशी छाननी मध्ये मला अपात्र ठरविण्यात आले.  या विरोधात मी हायकोर्टात पीटिशन दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रमेश मेश्राम यांनी अजूनपर्यंत कोणत्याही उमेदवारास वा पक्षास  समर्थन किँवा पाठींबा जाहिर केलेला नसुन विरोधक पाठींबा जाहिर केल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत . अश्या अफवांना कुनीही विश्वास ठेवू नये योग्यवेळी योग्य उमेदवारास समर्थन जाहीर करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
समाज हिताच्या मागण्या मान्य करणार्या उमेदवारास नक्की मदत करू असेही आश्वासन त्यांनी दिली. वरोरा भद्रावती क्षेत्रातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजाचे मतदान गेम चेंजर ठरतील अशी आशा रमेश मेश्राम यांनी व्यक्त केली.
........................,.................

    अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांच्याकडून             दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Comments