वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*आचारसंहिता कालावधीत अवैध दारूसंदर्भात 300 गुन्हे दाखल**Ø राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई*

*आचारसंहिता कालावधीत अवैध दारूसंदर्भात 300 गुन्हे दाखल*

*Ø राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई*

चंद्रपूर, दि. 12 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निवडणूक कालावधीत रोकड, दारु जप्ती, चेक पोस्टवर वाहनांची कडक तपासणी आदींबाबत सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 300 गुन्हे नोंदविले असून यात 15770 लिटर दारूसह 29 वाहने जप्त केली आहेत.

जिल्ह्यात मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात सहा विशेष पथके तयार केली असून या पथकात एक निरिक्षक, तीन दुय्यम निरिक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांकडून सहाही विधानसभा मतदारसंघात रात्रंदिवस अवैध दारूविरुद्ध पाळत ठेवून कारवाई करण्यात येत आहे. आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 300 गुन्ह्यात 280 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून या संपूर्ण कारवाईत 826 हातभट्टी दारू, 11930 लिटर मोहा सडवा, 2538 लिटर देशी दारू, 240 लिटर विदेशी दारू, 88 लिटर बियर, 142 लिटर ताडी, पाच लिटर परराज्यातील विदेशी दारू अशी एकूण 15770 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे.

यादरम्यान दारुची अवैधरीत्या वाहतूक करणारी 29 वाहनेही विभागाने जप्त केली असून एकूण मुद्देमालाची किंमत 40 लाख 61 हजार 105 रुपये आहे. याव्यतिरिक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तेलंगणा राज्याच्या सीमेवर परसोडा (ता. कोरपना) व लक्कडकोट (ता.राजुरा) या ठिकाणी सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच वर्धा व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरही अवैध वाहतुकीवर पाळत ठेवण्यात येत आहे.

*नागरिकांना आवाहन :* कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.

००००००

Comments