वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*मुंबईच्या स्नेह परिवारातील समाजसेवकांचा सत्कार* *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चाँरिटेबल ट्रस्टचा उपक्रम*

*मुंबईच्या स्नेह परिवारातील समाजसेवकांचा सत्कार* 

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चाँरिटेबल ट्रस्टचा उपक्रम* 

भद्रावती 
फक्त बातमी 

 मुंबई येथील स्नेह परिवारातील सदस्य नुकतेच भद्रावती येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी आले. या भेटी दरम्यान स्नेह परिवारातील समाजसेवक अशोक वायकुळ, ममता वायकुळ, विनय पाटील आणि संजय पाटील यांनी ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख (वरोरा -भद्रावती व राजुरा विधानसभा क्षेत्र) रविंद्र शिंदे  यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने  अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि कोषाध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे यांच्या शुभहस्ते समाजसेवक अशोक वायकुळ, ममता वायकुळ, विनय पाटील आणि संजय पाटील यांचा वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची  प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात  आला.
भेटी दरम्यान अशोक वायकुळ, ममता वायकुळ, विनय पाटील आणि संजय पाटील यांनी  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चाँरिटेबल ट्रस्टच्या समाजकार्याची सविस्तर माहिती घेतली. ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख (वरोरा -भद्रावती व राजुरा विधानसभा क्षेत्र) रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी व प्रसंशनीय असल्याचे मत स्नेह परिवारातील  समाजसेवकांनी व्यक्त केले.


Comments