वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*१८ व १९ ला भद्रावतीत श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव*

*१८ व १९ ला भद्रावतीत श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
          श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावतीच्या वतीने उद्या दि. १८व १९ ऑक्टोबरला दोन दिवसीय श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक नगाजी नगरातील संत नगाजी महाराज मंदिरात करण्यात आले आहे. या पुण्यतिथी महोत्सवात विविध अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधन, श्रींची घटस्थापना, पूजा व आरत असे कार्यक्रम होईल. यावेळी महिलांकरता व मुलींकरता महिला संमेलन आणि आनंद मेळावा, सामुदायिक प्रार्थना, जाहीर
कीर्तनाचा व गोपाळकाल्याचा
कार्यक्रम आयोजित करण्यात
आले आहे. नाभिक समाजातील
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी विचारमंथन, पोथीचे पारायण होईल.पालखी सोहळा , शोभायात्रा काढण्यात येणार या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात येणार या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भावीकानी उपस्थीत राहण्याचे आव्हान आयोजकानी केले आहे.

Comments