वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

कोल वेतन वाढीसाठी कामगार केपीसीएल खान पाडणार बंद**खान कामगार करणार कुटुंबासह खान क्षेत्रामध्ये काम बंद हडताल*

*कोल वेतन वाढीसाठी कामगार केपीसीएल खान पाडणार बंद*

*खान कामगार करणार कुटुंबासह खान क्षेत्रामध्ये काम बंद हडताल*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
            कर्नाटक ऐम्टा कामगारांचे गेल्या चार वर्षापासून केपीसीएल खाणीचे व्यवस्थापन व त्याची सहयोगी बरांज कोल माईन्स हे शोषण करत असून वेतन वाढीच्या निवड भूल-थापा देत आहे. मात्र अजूनही कोल वेतनात एकही रुपयाची वाढ केली नाही त्यामुळे इतर मागण्या घेऊन कामगारांनी दिनांक ३ ऑक्टोंबर पासून केपीसीएल कोळसा खाणीचे उत्पादन बंद करून खान बंद करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
        कर्नाटक एम्टा खान कामगारांना वेज बोर्ड लावण्यात यावा कामगारांना  सेफ्टी शूज, रेष शेल्टर , सेफ्टी गॉगल , पिण्यासाठी शुद्ध पाणी , मुलांसाठी स्कूल बस , २४ तास कामगारांसाठी उपचार केंद्र, वार्षिक बोनस , घर किराया या इतर मागण्यासाठी गेल्या चार वर्षापासून कामगार लढा देत आहे. या मागण्यासाठी चार वर्षात केपीसीएल कंपनी सोबत चाळीस बैठका झाल्या मात्र त्या विफल ठरल्या. या मागण्यासाठी कामगारांनी जेव्हा जेव्हा कंपनीच्या विरोधात आंदोलन केले तेव्हा कंपनी पोलीस बळाचा वापर करून लोकशाही पद्धतीने केलेले आंदोलन दडपण्यात आले. असाच प्रकार दहा दिवसांपूर्वी घडला अरविंद देवगडे या कामगारांनी वेज बोर्ड संदर्भात आंदोलन केले असता पोलिसांनी कॉलर पकडून आंदोलन स्थळापासून हटविल्याचा प्रकार घडल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
            या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच इतर  प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून केपीसीएल कंपनीच्या विरोधात आम्ही सर्व खान कामगार कुटुंबासह खान क्षेत्रामध्ये काम बंद हडताल करणार आहोत . आंदोलनादरम्यान शांतता एवं सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला पूर्णता संबंधीत शासन , प्रशासन , कंपनी जबाबदार राहील असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या पत्र परिषदेला अरविंद देवगड , विनोद आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडाम, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते अशोक ठेंगणे, शंकर बालपने , महेश तुंबडे, रवींद्र निखाड , विलास ताजने सह असंख्य कामगार उपस्थित होते.

Comments