वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझा प्रयत्न- खासदार प्रतिभा धानोरकरवरोरा-भद्रावती येथे महिला मेळाव्याचे आयोजन.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझा प्रयत्न- खासदार प्रतिभा धानोरकर
वरोरा-भद्रावती येथे महिला मेळाव्याचे आयोजन.

फक्त बातमी 

महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून प्रत्येक क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहीली आहे. मी एक महिला खासदार म्हणून माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या प्रत्येक महिलेचे सक्षमीकरणाकरीता प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा व भद्रावती येथे आयोजित तालुकास्तरीतय काँग्रेस कमेटीच्या महिला मेळाव्यात केले.
माझ्या विजयात महिलांचा मोठा वाटा असल्याने माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांच्या सक्षमीकरणाकरीता मी प्रयत्न करणार आहे. वरोरा तालुका व शहर कॉग्रेस च्या वतीने दि. 03 ऑक्टोंबर 2024 रोजी सिध्दीविनायक सभागृह वरोरा येथे तर भद्रावती तालुका व शहर कॉग्रेस च्या वतीने 04 ऑक्टोंबर 2024 रोजी सेलिब्रेशन हॉल भद्रावती येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या रुपाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात पहिली महिला खासदार म्हणून मला मान मिळाला यापुढे राजकारणासह सर्व क्षेत्रात महिलांनी सहभाग घ्यावा, असे देखील मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा साडी देऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्र पुनःश्च एकदा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणून आणण्याचा संकल्प देखील केला गेला. यावेळी मंचावर पोलिस उपविभागीय अधिकारी नयोमी साठम, काँग्रेस नेत्या कुंदाताई जेनेकर यासह तालुकाध्यक्ष सोबतच महिला पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Comments