वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीस अटक*

*सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीस अटक*

अतुल कोल्हे भद्रावती :-
       शहरातील एका भागात एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणातील आरोपीस भद्रावती पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. निलेश राजेश्वर चटपल्लीवार उर्फ नाना चटपल्लीवार, वय 37 वर्षे, राहणार भद्रावती. असे आरोपीचे नाव असून त्याचेवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्या पोटावर बुक्कीने मारहाण केली. सदर प्रकार हा 5 ऑक्टोबरला घडला. तीन दिवसानंतर मुलीचे पोट दुखू लागल्यानंतर तिने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली. सदर घटनेच्या पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments