वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भद्रावती येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

*भद्रावती येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             एका 42 वर्षीय युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तीन रोज गुरुवारला रात्रो  साडेनऊ वाजता शहरातील भोजवार्ड  येथे घडली. आशिष विठ्ठल झुरमुरे, वय 42 वर्षे, राहणार भोजवार्ड,  भद्रावती असे मृतक युवकाचे नाव आहे.सदर युवक हा आपल्या आजी सोबत भोजवार्ड  येथे राहत होता. घटनेच्या दिवशी तो बेडरूम मध्ये गेला. बराच वेळ बाहेर आला नसल्याने आजीने दार ढकलुन पाहिले असता तो पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचा आढळून आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.


Comments