वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

राष्ट्रपिता नगर विकास मंच तर्फे गांधी जयंती साजरी*

*राष्ट्रपिता नगर विकास मंच तर्फे गांधी जयंती साजरी*

अतुल कोल्हे भद्रावती -
            राष्ट्रपिता नगर विकास मंच भद्रावती तर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती गांधी चौक येथे साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण केल्यानंतर लाल  बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करण्यात आली. काशिनाथ मनगटे यांनी गांधी भजनाचे गायन करून त्यांच्या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रपिता नगर विकास मंच अध्यक्ष धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, रवी पवार, सुरज गावंडे, दिलीप ठेंग ,डॉ. यशवंत घुमे, जावेद शेख, दत्तू सैतान , रत्नाकर लुथळ, भाऊराव कुटेमाट , जयदेव खाडे ,ओम प्रकाश वैद्य , मनोहर नागपुर , अंजया पुल्लपवार , सुरेश मांढरे सह आदी  उपस्थित होते.

Comments