वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

आयुध निर्माणी चांदा येथे दारूगोळा प्रदर्शनीचे महाप्रबंधक विजयकुमार यांचे हस्ते उद्घाटन**प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घेण्याचे आवाहन*

*आयुध निर्माणी चांदा येथे दारूगोळा प्रदर्शनीचे महाप्रबंधक विजयकुमार यांचे हस्ते उद्घाटन*

*प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घेण्याचे आवाहन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                    आयुध निर्माणी चांदा वसाहतीतील सार्वजनिक सभागृहात दिनांक 1 ऑक्टोबर रोज मंगळवारला दुपारी तीन वाजता दोन दिवसीय दारूगोळा प्रदर्शनीचे उद्घाटन निर्माणचे महाप्रबंधक विजयकुमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी निर्माणीचे अन्य अधिकारी उपस्थित होते. सदर प्रदर्शनी 2 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे. सदर प्रदर्शनीत आयुध निर्माणी  चांदा येथे उत्पादित करण्यात येत असलेल्या दारूगोळा प्रतिकृती प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या  आहेत. यात पिनाका मिसाईल, विविध प्रकारचे बॉम्ब, राकेट आदींचा समावेश आहे. सदर प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाप्रबंधक विजयकुमार यांनी यावेळी केले आहे.

Comments