वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*ग्रामपंचायत चिरादेवी येथील पंतप्रधान आवास योजना यादीमध्ये संधीसाधूचेच नाव : मुख्य लाभार्थी प्रतिक्षेत* *गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*

*ग्रामपंचायत चिरादेवी येथील पंतप्रधान आवास योजना यादीमध्ये संधीसाधूचेच नाव : मुख्य लाभार्थी प्रतिक्षेत*
 
*गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*

अतुल कोल्हे भद्रावती -
                   पंतप्रधान आवास योजना ( PMAY ) मा. नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये  देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पक्के घर उपलब्ध करून देणारी योजना देशभर राबविण्यात आली होती आणि सुंरू आहे.

              पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशातील लाखो लोकांना हक्काचे घर मिळावे असा मानस  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून पक्के आणि कच्चे घराची यादी ग्रामपंचायत मार्फत मागविली जाते. ती यादी ग्रामपंचायत पाठवत असते. परंतु ग्रामपंचायत चिरादेवी येथे पंतप्रधान आवास योजनेच्या यादी मध्ये मुख्य लाभार्थी सोडून संधीसाधूचे ( जे सध्या पक्क्या घरामध्ये राहात आहेत) यांची नावे आल्याने या योजनेतील मुख्य लाभार्थी वंचित असल्याने खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे अश्याप्रकारे गावकऱ्यांमध्ये चर्चेला जोर धरला आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती घेऊन या यादीतील नावे पात्र आहेत काय? कोणाच्या आर्शीवादांने यादीमधील नावे पात्र होत आहेत? याची चौकशी करून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींना न्याय देण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

           पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशातील गरिब - गरजू लोकांना पक्के घर बांधून देण्याचे स्वप्न मा. पंतप्रधान यांचं आहे. परंतु मी मागील १-२ वर्षापासून घरकुलांची वाट बघत आहे. यावेळी घरकुलांच्या यादी मध्ये ज्यांना राहायला पक्के घर आहे अश्या व्यक्तीचे नाव आहेत. परिणामी मुख्य लाभार्थी या योजनेपासून वंचित राहयला नको. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल चौकशी करण्यात यावी. 
मारोती रोडे - लाभार्थी, चिरादेवी
----------------------------------------------

Comments