वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*संत शिरोमणी गुरू रविदास महाराज पुण्यतिथी यांची साजरी*

*संत शिरोमणी गुरू रविदास महाराज पुण्यतिथी यांची साजरी*

अतुल कोल्हे भद्रावती :
                संत शिरोमणी गुरु रविदास महाराज पुण्यतिथी उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवार दि.१० ऑक्टोबरला संत शिरोमणी गुरू रविदास महाराज मंदिरात वरोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अहतेशामजी अली यांचे हस्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून विविध कार्यक्रमाद्वारे पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी  धर्मेंद्र हवेलीकर,मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण मेंढे, सचिव विनोद खंडाळे,कोषाध्यक्ष रवींद्र पवार,सदस्य शंकर सदाफळे ,सरीताताई मेंढे,मंदा शेरकी,रुपाली वाढई, इंदू वाढई  आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान संत शिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमाताई खंडाळे, सचीव किर्तीताई पवार,कोषाध्यक्ष कविताताई मेंढे, यांचे हस्ते अहतेशामजी अली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी अहतेशामजी अली यांनी मंडळाचे कामकाज व पुढील वाटचाली संबंधाने चर्चा केली.त्यांनी यावेळी मंदिराच्या वाढीव बांधकामास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Comments