वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*वरोरा-माढेळी रस्त्यावरील वाहतूक समस्येवर उपाययोजना करा**आम आदमी पक्षाचे एकोणा खाण प्रशासनाला निवेदन*


*वरोरा-माढेळी रस्त्यावरील वाहतूक समस्येवर उपाययोजना करा*

*आम आदमी पक्षाचे एकोणा खाण प्रशासनाला निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            एकोणा कोळसा खाण सुरु झाल्यापासून वरोरा-माढेळी रस्त्यावर वेकोलीच्या अवजड वाहणांची संख्या वाढल्याने हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.याशिवाय या रस्त्यावर जागोजागी वेकोलीची अवैध वाहणांची पार्कींग केल्या जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन या रस्त्यावर अपघाताची संख्या वाढुन रस्ता सर्व सामान्य नागरीकांसाठी धोकादायक झाला आहे.हि समस्या लक्षात घेऊन यावर त्वरीत उपाययोजना करावी अन्यथा याविरोधात आम आदमी पक्षातर्फे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आम आदमी पक्षातर्फे एकोणा क्षेत्रीय महाप्रबंधकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन सादर करतांना आम आदमी पक्षाचे जिल्हा ऊपाध्यक्ष सुरज शहा,युवा जिल्हा ऊपाध्यक्ष सुमीत हस्तक, वरोरा तालुकाध्यक्ष गौरव मेले,ऊपाध्यक्ष अमोल पिंपळशेंडे, भद्रावती युवा शहर अध्यक्ष रोहण गज्जेवार वरोरा शहर अध्यक्ष बंटी खडके आदी ऊपस्थीत होते.

Comments