वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*शिंदे महाविद्यालयाचा कबड्डी संघ राज्यस्तरावर**नागपूर विभागात भद्रावतीचा डंका*

*शिंदे महाविद्यालयाचा कबड्डी संघ राज्यस्तरावर*

*नागपूर विभागात भद्रावतीचा  डंका* 

अतुल कोल्हे भद्रावती :-
             क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे आज ४/१०/२४ पार पडल्या. या विभागस्तरीय स्पर्धेत १७ वर्ष मुले वयोगटात अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा दारुण पराभव करत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती या संघाने घवघवीत यश संपादन केले व नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. नागपूर विभागात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावतीचा डंका वाजवला.  ८/१० /२४  ते १०/१०/२४ ला सांगली जिल्हा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत हा संघ नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

नागपूर विभाग स्तरावरील कबड्डी स्पर्धेत अव्वल येऊन राज्य स्तरावर निवड झाल्याने कबड्डी खेळाडू संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, डॉ ज्ञानेश हटवार , माधव केंद्रे, डॉ सुधीर मोते, किशोर ढोक, डॉ प्रशांत पाठक, शुभम सोयाम, अजिज शेख, सचिन वावरदडपे, रोडे,  समस्त प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी क्रिडा प्रेमींनी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Comments