वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*राजुरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी* *चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची* *खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी*

 *राजुरा मतदारसंघातील उमेदवारांची* 
खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी

चंद्रपूर, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 70- राजूरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. 
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, राजुरा येथे करण्यात येईल.
70 – राजुरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस उपविभागीय कार्यालय सभागृह, राजूरा येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राजुराचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र माने यांनी कळविले आहे. 
००००००
 *चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची* 
*खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी*
चंद्रपूर, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 74- चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. 
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार चिमूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे करण्यात येईल. 
74 – चिमूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद सिंग हे वरील दिनांकास व वेळेस उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे चिमूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी कळविले आहे. 
००००००

Comments