वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने पेट्रोलींग दरम्यान 75,00,000/- रु.(पंचहत्यात्तर लक्ष रु.) ची रोकड जप्त (चंद्रपूर पोलीसांची कामगिरी)

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024  च्या अनुषंगाने पेट्रोलींग दरम्यान 75,00,000/- रु.(पंचहत्यात्तर लक्ष रु.) ची रोकड जप्त (चंद्रपूर पोलीसांची कामगिरी)

अकूंश अवथे चंद्रपूर 
  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाÚयांना पकडुन कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींग साठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले असुन त्यामार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना आज दिनांक 29/10/2024 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी.पथकाने संयुक्तरित्या तपासणी केली असता सदर वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहनास पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी. पथक व वरोरा पोलीसांनी वाहन धारकाकडे विचारपुस केली असता, वाहन धारकाने रोख रक्कम एकुण 75,00,000/- रु. (अक्षरी रु.पंचहत्यात्तर लक्ष) वाहतुकी बाबतचे कारण समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन सदरची रोख रक्कम जप्त करुन पुढील चौकशी करीता आयकर विभागाचे स्वाधीन करण्यात आले आहे. 
  सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे नेतृत्वात वरोरा पोलीस आणि एफ.एस.टी.पथक वरोरा यांनी केली आहे.

Comments