वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

जिल्ह्यात सात उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल**Ø सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल*

*जिल्ह्यात सात उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल*

*  सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 24 :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या तिस-या दिवशी आज (दि. 24) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्लारी पाईकराव (अपक्ष), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात निरंक, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विजय नामदेवराव वडेट्टीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात किर्तीकुमार भांगडीया (भारतीय जनता पार्टी) आणि सतिश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केले.

तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 19 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 20 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 20 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

००००००

Comments