वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळाव्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन जिल्ह्यातून शेकडो पत्रकार जाणार

साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा

व्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी  शिर्डीत राज्य अधिवेशन 

जिल्ह्यातून शेकडो पत्रकार जाणार

 चंद्रपूर ( जिल्हाप्रतिनिधी)

 जगात ३ लाख ७० हजार सदस्य संख्या असलेल्या आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबांबाच्या नगरीत भरणार आहे. सदर अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातील शंभरावर पत्रकार हजेरी लावणार आहेत. 
 या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या, प्रश्नांवर चर्चा, ठराव होणार आहेत.  त्याचबरोबर दोन दिवसांत पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे, बौध्दिक व सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजनही करण्यात आले आहे.

 व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचे पहिले सत्र ३१ रोजी सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे. यावेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय, आमची भूमिका, कार्य व जबाबदारी तसेच संघटनेच्या सरदारांची कामगिरी सांगितली जाणार आहे. दुसऱ्या सत्रात सकाळी ११ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार हेमंत पाटील, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता अरुण शितोळे पाटील व भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते हे प्रमुख अतिथी असणार आहेत. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ' व्हॉईस ऑफ मीडिया' च्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी ' व्हॉईस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार २०२४ 'चे वितरण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. यंदा विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अशोक वानखेडे, तुळशीदास भोईटे व सरिता कौशिक हे या पुरस्काराचे मानकरी आहेत.

अधिवेशनाचा समारोप दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. यावेळी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉग्रेसचे विधीमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे, आ. क्षितिज ठाकूर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, साईबाबा विश्वस्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.

 या अधिवेशनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांना ही एक पर्वणी ठरणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे केवळ राज्यातील नव्हे तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पदाधिकारीही या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. भारतातील सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष तसेच नेपाळ, स्पेन, अफगाणिस्तान यासह विविध देशातील निमंत्रित सदस्य अधिवेशनास येणार आहेत. राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी केले आहे.


 विविध चर्चासत्रांचे आयोजन

 दि. ३१ ऑगस्ट - पहिले सत्र - संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय, दुसरे सत्र - उद्घाटन समारंभ व जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण, तिसरे सत्र पुरस्कार प्राप्त संपादकांची प्रकट मुलाखत, चौथे सत्र - आम्ही घेतोय पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी ( चर्चासत्र, सत्कार समारंभ), पाचवे सत्र - माझा जिल्हा माझे व्हिजन ( जिल्हाध्यक्षांचे चर्चासत्र ), अधिवेशन घेण्यामागची भूमिका...(चर्चासत्र ), रात्री - सांस्कृतिक कार्यक्रम

 दि. १ सप्टेंबर - पहिले सत्र - ठराव वाचन, दुसरे सत्र - पत्रकार व पत्रकारिता वाचवण्यासाठी आम्हा पत्रकारांचे योगदान काय असणार ( प्रकट मुलाखत ), तिसरे सत्र - संविधान वाचवण्यासाठी महिलांचा सहभाग का आवश्यक ? (चर्चासत्र ), समारोप सत्र - संघटनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

चंद्रपूर आणि क्षेत्रातील क्षेत्रातील खासदार प्रतिभाताई धानोरकर ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे रवींद्र शिंदे, गोंडवाना यूनिवर्सिटी सदस्य डॉक्टर सागर वझे, भाजपा नेते किशोर टोंगे , डॉक्टर चेतन खूटेमाटे, माजी नगराध्यक्ष एहेतेशाम अली, भाजप विधानसभा अध्यक्ष रमेश राजुरकर, रोटरी अध्यक्ष बंडू देऊळकर आदी प्रतिष्ठित मान्यवरांनी या अधिवेशनासाठी वरोरा शहरातून सर्व पत्रकारांना शुभेच्छा व्यक्त केले आहे.

Comments