लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथील व्यायामशाळा आणि आर.ओ. मशीनकरीता निधी वितरीत*

*पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथील व्यायामशाळा आणि आर.ओ. मशीनकरीता निधी वितरीत*
 *व्यायामशाळेकरीता 48 लक्ष 52 हजार तर आर.ओ. मशीनकरीता 10 लक्ष रुपये मंजूर*
 *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे युवक आणि खेळाडूंनी मानले आभार*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 03 : जिल्ह्यात पायाभूत सुविधांसोबतच आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा आदींचे जाळे उभारण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या पुढाकारानेच नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत बल्लारपूर येथील व्यायामशाळेकरीता 48 लक्ष 52 हजार तर विसापूर येथील क्रीडा संकूलात आर.ओ. मशीन करीता आमदार निधीतून 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 या वर्षात नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत 14 कोटी 46 लक्ष रुपये (3.5 टक्के) शासनाकडून अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या योजनेतून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने बल्लारपूर येथील झाकीर हुसेन वॉर्डातील व्यायामशाळेच्या पहिल्या माळ्यावर अत्याधुनिक सभागृह, मेडीटेशन म्युजीक व इतर बांधकामाकरीता 48 लक्ष 52 हजार रुपये ऐवढ्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 
विसापूर ता. बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकूल येथे खेळाडूंना पिण्याचे शुध्द पाणी मिळण्यासाठी आर.ओ संयंत्र बसविण्याकरीता आमदार निधीतून 10 लक्ष रुपये मंजूर झाले असून सदर निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे. व्यायामशाळा आणि आर.ओ. करीता निधी मंजूर केल्यामुळे युवक तसेच खेळाडूंनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
०००००

Comments