लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे विद्यार्थ्यांचा शपथविधी समारोह

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे विद्यार्थ्यांचा शपथविधी समारोह 

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

स्थानिक वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल, मार्डा रोड वरोरा येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली यात हेड बॉय म्हणुन सार्थक मिलमिले, हेड गर्ल अदिती गायकवाड, इंग्रजी भाषा प्रमुख गुंजन वागदरकर,  क्रांतदर्शी डांगरे एमएसपी लीडर माधवी पिंपळशेंडे, रक्षित जयस्वाल क्रीडा प्रमुख साची  सातपुते, रणवीर बाकमवार सागर हाऊस लीडर पार्थ धानोरकर, निधी वांढरे, धरती हाऊस लीडर अंश अरमुरवार, वैदेही आगलावे आकाश हाऊस लीडर आशिता वैद्य,भार्गव गिलोरकर अग्नी हाऊस लीडर आरुष पिसे,शैलेजा रणदिवे लिटरेचर प्रमुख आयुष साठे, सायन्स क्लब सेक्रेटरी श्रीनिवास खटी, मॅथ क्लब सेक्रेटरी आर्या जुनघरे, आयटी सेक्रेटरी जानवी बजाज, आर्ट क्लब सेक्रेटरी गौरी तावाडे, हेरिटेज सेक्रेटरी क्रीष्णा खडसे, हेल्थ क्लब सेक्रेटरी प्रज्योत कट्टेवार, इको क्लब सेक्रेटरी सम्राट मेंढे यांची निवड होऊन शपथविधी समारोह संपन्न झाला सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मा. श्री मानकचंदजी मालु (Chairman SBPS)  प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री योगेश कौटकर(तहसीलदार, तहसील कार्यालय वरोरा) माननीय श्री अनिल मेश्राम(API पोलीस स्टेशन वरोरा) माननीय श्री जॉन्सन थॉमस (प्राचार्य SBPS) उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी डोंगरवार, पर्णवी डाखोरे दिव्या दवंडे,अयमान शेख यांनी केले.सहाय्यक शिक्षिका भारती अलादा यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका अंकिता कापसे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण विभागातील तहसीलदार यादव, पांडुरंग कुमरे, सुधाकर राठोड,पंकज शेंडे कोमल चांदेकर  तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments