लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जय बजरंग बली चौक नाम फलकाचे अनावरण*

*जय बजरंग बली चौक नाम फलकाचे अनावरण*

अतुल कोल्हे भद्रावती :  
              शहराच्या मुख्य मार्गावरील वन विभाग जवळील चौकास जय बजरंग बली चौक असे नामकरण करण्यात आले. चौकाच्या फलकाचे अनावर सामाजिक कार्यकर्ते दिलीप मांढरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते. 
    जय बजरंग बली मित्रपरिवार समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या चौकाचे जय बजरंग बली चौक असे नामकरण करून तसे फलक लावले. या फलकाचे अनावरण दिनांक २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता पार पडले. यावेळी जय बजरंग बली मित्र परिवाराचे अध्यक्ष उमेश शहा, उपाध्यक्ष राम चांदेकर, जिगर ठक्कर,रुपेश मांढरे,विनोद सातपुते, चंद्रशेखर मस्के, मंगेश बुरडकर, सुनील शेंडे, सचिन कुटेमाटे, वैभव दारव्हणकर, शुभम पचारे, ओम बुरेवार, रजत नागपुरे, पवन नागपुरे,स्वराज,गोपाल पा, कार्तिक लेडांगे, अंकुश नागपुरे, पवन हुरकट, रोहित ढवस, वैभव बेलेकर शिवम सक्सेना, सुनील पारशिवे,आशिष कार्लेकर, आकाश राऊत, रुपेश चहारे आदी उपस्थित होते.

Comments