संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसईच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबी एसई च्या तायक्वांदो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे  आयोजन वरोरा : संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने दिनांक 21 ते 24 जूनला तायक्वांदो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धांमुळे वरोरा शहराला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे. शाळेच्या प्राचार्या राणी पटेल यांनी माहिती देताना सांगितले की, शाळेत होणाऱ्या तायक्वांदो झोनल स्पर्धेत बंगळुरू, पुणे आणि तिरुवनंतपुरम विभागातील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. वरोरा परिसरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. तायक्वांदो स्पर्धेनंतर लगेचच सीबीएसईच्या क्लस्टर-९ स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांतील विद्यार्थी सहभागी होणार असून, या स्पर्धा केवळ मुलांच्या गटासाठी असतील. या दोन्ही स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी नागरिक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्या रा...

विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांचे शिवसेनेतर्फे भद्रावतीत जंगी स्वागत**शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषाताई कायंदे यांची चंद्रपूर जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती दरम्यान जिल्ह्यात प्रथम आगमन*

*विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांचे शिवसेनेतर्फे भद्रावतीत जंगी स्वागत*

*शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषाताई कायंदे यांची चंद्रपूर जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती दरम्यान जिल्ह्यात प्रथम आगमन*

 भद्रावती.
अतुल कोल्हे 
               आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता शिवसेना शिंदे गटातर्फे शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांची निवडणूक चंद्रपूर जिल्हा प्रभारी म्हणून तर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषाताई कायंदे यांची चंद्रपूर जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांच्या चंद्रपूर जिल्हा प्रथम आगमनानिमित्त भद्रावती तालुका तथा शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार चौकात शिवसेना जिल्हा संघटक ॲडव्होकेट युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात, ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी एडवोकेट युवराज धानोरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व राम मंदिराची प्रतिकृती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी कृपाल तुमाने, शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मनीषाताई कायंदे, महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे सचिव शुभमदादा नवले, जिल्हा संपर्कप्रमुख किशोर राय, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य हर्षल शिंदे, जिल्हा संघटक एडवोकेट युवराज धानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृपाल तुमाने यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर स्वागत समारंभाला युवा सेना जिल्हाध्यक्ष विनोद बुटले, विधानसभा संघटक नरेश काळे,अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जमील शेख, महिला जिल्हाध्यक्ष मीनल आत्राम, माजी नगरसेवक प्रफुल सारवान, तृप्ती हिरादेवे, संतोष पारखी, अरविंद धिमान, सुरज खंगार, दीपक कामतवार आदी स्थानिक पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments