वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील गड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात**आप चे विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या प्रयत्नाला यश*

*नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील गड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात*

*आप चे विधानसभा प्रमुख  सुरज शहा यांच्या प्रयत्नाला यश*

अतुल कोल्हे भद्रावती :-

          आम आदमी पार्टीच्या वतीने नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील गड्डे मुक्त करण्यासाठी नंदुरी टोल नाक्यावर काही दिवसा आधी दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद मिळाला आहे. आपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेकदा या विषयावर प्रशासनाकडे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि स्थानिकांच्या मागणीनुसार, अखेर प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. 
          नागपूर-चंद्रपूर महामार्ग हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असून, रस्त्यावरील गड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली होती. या परिस्थितीला बदलण्यासाठी आप ने नंदुरी टोल नाक्यावर निवेदन देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. 
        महामार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याने आता प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा आहे. आम आदमी पार्टी स्थानिक प्रशासनाकडून रस्त्याचे काम जलद गतीने आणि योग्य प्रकारे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करते. यापुढेही नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील गड्डेमुक्तीचे काम पूर्ण होईपर्यंत आम आदमी पार्टी स्थानिक पातळीवर लक्ष ठेवून राहील आणि आवश्यक त्या ठिकाणी आवाज उठवत राहील असे सांगण्यात आले आहे.

Comments