लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*भद्रावती तालुका महिला कॉग्रेसच्या माजी अध्यक्षा वर्षा ठाकरे यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश*

*भद्रावती तालुका महिला कॉग्रेसच्या माजी अध्यक्षा वर्षा ठाकरे यांचा 
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश* 

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

      भद्रावती तालुक्यातील कुचना येथील रहीवासी तथा  भद्रावती तालुका महिला कॉग्रेसच्या माजी अध्यक्षा वर्षा राजेश  ठाकरे यांनी काल दि. १७ ऑगस्ट रोजी  नागपूर येथील रेडीसन ब्लू हॉटेल येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
    याप्रसंगी शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविद्र शिंदे , चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी संपर्क प्रमुख  सुषमा  साबळे,जेष्ठ शिवसैनिक जयदीप पेंडसे, पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे आणि भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल प्रामुख्याने उपस्थित होते.
      वर्षा ठाकरे यांचे पती राजेश ठाकरे माजी जि.प. सदस्य होते. वर्षा ठाकरे यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दित कुचना ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच व सदस्य पदावर कार्य केले. त्या कुचना ग्रा.पं. च्या विद्यमान सदस्या तसेच भद्रावती नागरी पतसंस्थेच्या विद्यमान संचालिका आहे. दिक्षा कमेटी व तालुका संजय गांधी निराधार योजना कमेटीच्या  त्या माजी सदस्या आहे. सोबत विविध सामाजिक संस्था व संघटनांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. शिवसेना ( उ. बा. ठा. )चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी व वरोरा-भद्रावती विधानसभा महीला आघाडीच्या वतीने  त्यांचे स्वागत करण्यात आले.
---------------------------------------

Comments