लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*भद्रावती नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सुधाकर कुलथे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश**जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती*

*भद्रावती नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सुधाकर कुलथे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश*

*जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती*
 
भद्रावती 
चेतन लुतडे 

स्थानिक नगरपालिका क्षेत्रातील विजासन वार्डचे रहिवासी तथा नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सुधाकर सदाशिव कुलथे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नुकताच प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुधाकर कुलथे गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी दलित शोषित संघर्ष समितीत (बीएस४) कार्य केले. १९९० मध्ये बहुजन समाज पार्टीने मंडल आयोग लागू करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मार्च आयोजित केला होता. या आंदोलनात सुधाकर कुलथे यांनी सक्रिय सहभाग घेऊन पूर्व विदर्भात सायकलने दौरा केला. भद्रावती नागरिक सहकारी पतसंस्थेचे ते माजी संचालक सुद्धा आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याने प्रेरित होऊन सदर पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सुधाकर कुलथे यांनी याप्रसंगी सांगितले.
सुधाकर कुलथे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे,तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे,युवासेना सरचिटणीस येशु आरगी,युवासेना तालुकाप्रमुख राहुल मालेकर, माजी नगरसेवक प्रशात कारेकर,उपतालुकाप्रमुख  शिला आगलावे,भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, वर्षा ठाकरे, गजानन गोवारदिपे , शरद पुरी , अनिल सिंग, शशिकांत राम, आकाश बागल, आकाश बुरडकर, स्वप्नील दाते, अनिल दडमल, बादल विरुटकर, मनोज टिपले,  विश्वास कोंगरे, भुमेश्वर वालदे,विशाल नारळे, गजानन स्वान, महेश उताने , संजय उमरे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Comments