लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

शिवसेना (उबाठा) तर्फे भद्रावतीत २७ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन**महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांची उपस्थिती*

*शिवसेना (उबाठा) तर्फे भद्रावतीत २७ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन*

*महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांची उपस्थिती*

अतुल कोल्हे भद्रावती :  
                येथील तालुका क्रिडा संकुल येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दि. २७ ऑगस्ट मंगळवारला भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे आहेत.
 हा महोत्सव मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ व सायं.६ ते १० वाजेपर्यंत पार पडणार आहे.
  या महोत्सवात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते भारत गणेशपुरे हजेरी लावणार आहे. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी श्रीकृष्ण ,मुलींसाठी राधा तर विवाहित महिलांसाठी माँ यशोदा वेशभुषा स्पर्धा तसेच रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या विविध स्पर्धामध्ये भाग घेणा-यासाठी लाखो रूपयांची बक्षिसे ठेवण्यांत आली आहेत.यशस्वी स्पर्धकांसह स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
   कार्यक्रमात प्रसिद्ध लावणी कलाकार सोनाली पाटील व त्यांच्या संचाचा समावेश आहे. कार्यक्रमाचे अँकरिंग प्रसिध्द अँकर परेश हे त्यांच्या खास डॉक्टर गुलाटीच्या वेशभुषेत करणार आहे. जे विदर्भरत्न पुरस्काराने सन्मानित झाले आहे.
या महोत्सवात भद्रावतीतील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यांत येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाप्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे व समस्त शिवसेना (उबाठा) पदाधिका-यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रपरिषदेत केले. याप्रसंगी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, महेश जीवतोडे आदी उपस्थित होते.


Comments