लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांकडून**विशेष गौरव पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित*

*विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांकडून*
*विशेष गौरव पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 21 : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना एकरकमी 10 हजार व 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार निवडीसाठी संबंधितांनी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावे, असे सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
इयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या पाच माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 
*पुरस्काराकरीता पात्रता* : केन्द्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या ग्रेड शीट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जोडण्यात यावे. पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना एकरकमी 10 हजाररुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.

तसेच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इ. यांना अशा कार्याबद्दल त्यांचा सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा पुरस्कार, जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत प्रदान करण्यात येणार आहे.
 तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक/ पत्नी / पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 15सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधित माजी सैनिक / विधवांनी नोंद घ्यावी, असे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

Comments