वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध!*

*चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध!*

वरोरा 

महाराष्ट्रामध्ये महिलांची व युवतीची सुरक्षा  अत्यंत दयनिय झालेली असुन देशभरात महिलां व युवती वरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असुन त्याला रोख लावण्यात महाराष्ट्रातील घटनाबाह्य मिदे सरकार अपयशी ठरत आहे व नुकतीच  मुख्यमंत्र्याच्या निवासी जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथे एका शाळेत तीन आणि चार वर्षीय चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. याकरीता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने महाराष्ट्र बंद करीता परवानगी नाकारल्यामुळे संविधानाचा व न्यायालयाचा आदर करीत महाराष्ट्र बंद मागे घेतला. 
महाराष्ट्रातील लेकिंच्या संरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याकरीता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे “शिवालय”मध्यवर्ती  कार्यालय वरोरा , शिवनेरी कार्यलय भद्रावती तसेच ग्रामीण भागात तोंडाला काळ्या फिती बांधुन व काळे झेंडे दाखवुन चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, जिल्हा महीला सघंटीका नर्मदाताई बोरेकर यांच्या मार्गदर्शनात व. भद्रावती तालुकाप्रमुख सौ.आशाताई ताजने महीला आघाडी तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात ग्रामीण भागात बदलापुर घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे,विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर,भद्रावती तालुकाप्रमुख नरेद्रं पढाल,युवीसेना सरचिटणीस यशु आरगी,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, शहरप्रमुख खेमराज कुरेकार,युवासेना तालुकाप्रमुख राहुल मालेकर, माजी नगरसेवक प्रशात कारेकर,माजी बाधकाम सभापती सुधाकर कुलथे,उपतालुकाप्रमुख सौ शिलाताई आगलावे,भद्रावती शहर समन्वयक सौ.भावनाताई खौब्रागडे, वर्षाताई ठाकरे, 
गजानन गोवारदिपे विभाग प्रमुख टेमुर्डा, शरद पुरी उपजिल्हा प्रमुख युवासेना, अनिल सिंग, वरोरा उपशहर प्रमुख, शशिकांत राम, वरोरा उपशहर प्रमुख, आकाश बागल, आकाश बुरडकर, स्वप्नील दाते, अनिल दडमल, बादल विरुटकर, मनोज टिपले, उपशहरप्रमुख विश्वास कोगरे,शहर समन्वयक भुमेश्वर वालदे,विशाल नारळे, गजानन स्वान, महेश उताने व ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदअधिकारी उपस्थित होते.

Comments