Skip to main content

1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

14 हजार शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनीने पात्र करून घ्या.भाजपा नेते डॉ. रमेश राजुरकर यांची मागणी

 
 अपात्र शेतकऱ्यांचे पीक विमा पात्र करून कंपनीने त्वरित द्यावे.

 भाजपा विधानसभाप्रमुख रमेश राजूरकर यांची मागणी.

वरोरा 
चेतन लुतडे 
चंद्रपूर जिल्ह्यात जुलै, आगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  कापूस ,तूर, सोयाबिन वर आलेला मोझॉक किड रोग व नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संदर्भातील सर्व अहवाल शासन व कंपनीस  सादर करण्यात आले होते. पिक विमा नुकसान नियमानुसार ७२ तासात याबद्दलच्या सुचना कंपनी कडे ऑनलाईन करण्यात आल्या होत्या .यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नुकसान भरपाई प्रमाणे सोयाबीन या पिकाचे काही प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे मिळाले परंतु कापूस व इतर पिकांचे पीक विमा अजूनही मिळालाच नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

या विषयाच्या अनुषंगाने वरोरा भाजप नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी तहसीलदार वरोरा येथे निवेदन सादर करण्यात आले. 
या निवेदनामध्ये प्रामुख्याने या मागण्या करण्यात आले आहेत.

प्रमुख मागण्या :-

१. सोयाबीन नुकसान भरपाईची उर्वरित ७५ टक्के रक्कम तात्काळ वाटप करावी.

२. कापूस, तुर नुकसानी प्रमाणे १०० टक्के वाटप करावे.

३. अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई सर्व्हे शिट व माहिती देण्यात यावी.

४. अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची चौकशी करुन पात्र करण्यात यावे.

येत्या ७ दिवसांमध्ये आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण तालुक्यामध्ये पिक विमा कंपणीविरुध्दात आक्रमक आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा भारतीय जनता पक्षाचे वरोरा विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रचार प्रमुख डॉ रमेश राजूरकर यांनी दिला. यावेळी तालुका डॉ. भगवान गायकवाड, शहर अध्यक्ष सुरेश महाजन, प्रदेश सचिव युवा मोर्चा करण देवतळे, मा. नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, मा. जिल्हा प. स. श्री राजुभाऊ गायकवाड, ओ.बी.सी आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे, जिल्हा संयोजक वैद्यकिय आघाडी डॉ सागर वझे, श्री राजु दोडके.

श्री विशाल पारखी, श्री उमेश माहुरे, श्री गजानन राऊत, श्री दिपक चव्हान, श्री देविदास ताजणे, श्री विनोद लोहकरे, श्री मधुसुदन टिपले, श्री सारंग किन्हेकर, श्री विजय पावडे, श्री राजुभाऊ दाते, श्री प्रकाश दुर्गपुरोहित, श्री निंबाळकरजी, श्री शरद कातोरे, श्री प्रमोद ढाकणे, शहर अध्यक्ष श्री संजय राम, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी श्री अनिकेत नाकाडे, तालुका महामंत्री भाजयुमो. श्री सुरज धात्रक तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संख्येने शेतकरी उपस्थित होते.




Comments