वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

1

प्रति 
माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब,
पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर.

विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत.
अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९. 

महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती. 

मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला .

मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत होते. परंतु २०२४-२५ ला कोणतेही ठोस कारण न देता मला कामावरून कमी करण्यात आले. आणि माझ्या जागी सिद्धार्थ खोब्रागडे  नियुक्ती देण्यात आली. श्री खोब्रागडे हे चिमूर (डोमा) येथील जिल्हा परिषद शाळेतून पटसंख्या अभावी अतिरिक्त झाले होते. सदर प्रकारे माझ्यावर अन्याय झाला असल्याने त्या विरोधात मी तोंडी व लेखी स्वरूपात वेळोवेळी न्याय मागितला होता. परंतु काहीही उत्तर मिळाले नाही. 
शासनाने दिनांक ०५/०६/२०२५ रोजी काढलेल्या परीपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गुणवत्ता व मुलाखतीच्या आधारे मला पुन्हा नियुक्ती देण्यात आली होती. 
परंतु गटशिक्षणाधिकारी यांचा आदेश क्रमांक २६९, दिनांक ०५/०८/ २०२५ नुसार न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व शाळा समितीने चुकीची नियुक्ती केली असे कारण देऊन माझी नियुक्ती रद्द करण्यात आली. याबाबत मला कोणतीही पूर्वसूचना किंवा प्रत्यक्ष सुनावणीचा अधिकार देण्यात आलेल्या नाही. 

तसेच श्री सिद्धार्थ खोब्रागडे यांना शाळा समितीच्या आदेशान्वये नियुक्ती देण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी ते साफ खोटे आहे. शासनाच्या २०१२ व २०२५ च्या परिपत्रकानुसार मी २०१६ पासून कार्यरत असल्याने व मुलाखत आणि गुणांकन प्रक्रियेत प्रथम आल्याने २०२५-२६ मध्ये मला नियुक्ती देण्यात आली होती नंतर मात्र मला काढून श्री खोब्रागडे यांना चुकीच्या पद्धतीने नियुक्ती देऊन माझ्यावर अन्याय केला गेला. २०१६ पासून माझ्यासोबत क्रीडा व कार्यानुभव  पदासाठी अन्य दोघांना नियुक्ती देण्यात आली होती. ती नियुक्ती वर्ष  २०२५-२६ मध्ये देखील कायम करण्यात आली. मग माझी नियुक्ती का रद्द केली गेली.
मी या विरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून दात मागितली परंतु खोब्रागडे यांना रजेवर जायला सांगून ते गैरहजर असल्याचे अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. आणि १ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा खोब्रागडे यांना रुजू करून घेतले गेले.

 करिता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मला न्याय द्यावा तसेच सत्र २०२६-२७ मध्ये पुन्हा माझ्यावर अन्याय होणार नाही याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.

आपली

Comments