लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य - खासदार प्रतिभा धानोरकर

जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य - खासदार प्रतिभा धानोरकर 

वरोरा 

लोकसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी खासदार झाली आहे .त्यामुळे जनतेची सेवा करणे हेच माझे प्रथम कर्तव्य असून त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वणी येथे आयोजित जनता दरबाराच्या वेळी सांगितले. 
लोकसभेत मला जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिल्याने जनतेनी सांगितलेली काम कर्तव्य समजून मी करणार आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी प्रामुख्याने वेळोवेळी जनता दरबार घेणार आहे. या माध्यमातून जनतेशी देखील नाळ जुळवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आरोग्य, वीज, रस्ते व व महसुली कामे तात्काळ व्हावी या करीता देखील मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सामान्य नागरिकांची कामे त्वरित करून द्यावी असे देखील मत यावेळी खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदने खासदार धानोरकर  यांना दिली.

Comments