वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण करणाऱ्या मयूर चा बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद वरोरा तर्फे सत्कार

बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण करणाऱ्या मयूर चा बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद वरोरा तर्फे सत्कार


चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील रहिवासी असलेला मयूर महादेव देऊरमल्ले हा युवक सायकल ने प्रवास करीत 12 ज्योतिर्लिंग ,चारधाम यात्रा पूर्ण करत घरी परतताना वरोरा येथील हनुमान मंदिर यात्रा वॉर्ड येथे विश्व हिंदू परिषद,बजरंग दल वरोरा तर्फे त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सहा महिन्यांपूर्वी घरून निघताना 12 ज्योति्लिंगां चार धाम यात्रा पूर्ण करण्याचा निश्चय करत सहा महिन्यात श्री शैलम ,मल्लिकांर्जून , रामेश्र्वरम , वैजनाथ , काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर ,घृष्णेश्वर , केदारनाथ ,महाकालेश्वर ,ओंकारेश्वर ,चार धाम मधील द्वारका ,जगन्नाथ पुरी ,रामेश्वर ,बद्रीनाथ असा एकूण 18000 किलोमीटर चा प्रवास सायकल ने पूर्ण केला .सायकल ने प्रवास करताना खूप मेहनत घ्यावी लागली परंतु ईश्वरीय आशीर्वादाने हे सर्व शक्य झाल्याचे मयूर  ने सांगितले .
मयूर सायकल वाला म्हणून समाज माध्यमांवर प्रसिद्ध 
इंस्टाग्राम मध्ये मयूर सायकल वाला हा आपल्या प्रवासातील प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ टाकत पूर्ण 12 ज्योति्लिंगां व 4 धाम यात्रा पूर्ण केली त्यामुळे प्रसिध्दी देखील मिळाली.


त्या निमित्य विश्व् हिंदू परिषद बजरंद्ल् अध्यक्ष विजय जुनघरे,चेतन जीवतोडे,वैभव ठाकरे,शुभम गोल्हार,बाला चांभारे,तेजस लोहकरे,रोहित पिंपळशेंडे,ओम कांबळे चेतन निकोडे आकाश काकडे अन्य सर्व सदस्य उपस्तित होते

Comments