लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’**31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा*

*मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’*
*31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार* 

*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा* 

अकूंश अवथे चंद्रपूर 


चंद्रपूर, दि. 5 : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे 31 ऑगस्ट नंतरही ही योजना सुरू राहणार आहे, त्यानुसार पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंदनसिंग चंदेल, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. राजूरकर, प्रा. अतुल देशकर आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 2 लक्ष 84 हजार 923 अर्ज आले असून 2 लक्ष 11हजार 326 अर्जाची तपासणी झाली आहे. यापैकी 1 लक्ष 87 हजार 463 अर्ज मंजूर झाले असून त्रुटी पूर्ततेत 23718 अर्ज आहे. पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील. तसेच दोन दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. 

*अभय योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ*

चंद्रपूर, दि. 4 :महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्काच्या व दंडाबाबतअभय योजना -2023सुरू केली असून1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या कालावधीत जवळपास 242 नागरिकांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतलेला आहे. तसेच अभय योजना- 2023 चा दुसरा टप्पा 1 फेब्रुवारीते 30 जुन 2024 पर्यंत सुरू होता. परंतु सदर योजनेसंदर्भात जनतेचा सहभाग लक्षात घेता शासनाने या योजनेला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जनतेने अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारीअंकिता तांदळेयांनी केले आहे.

Comments