लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*22 ते 24 ऑगस्ट दरम्यान नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी (भरती) प्रक्रिया*

*22 ते 24 ऑगस्ट दरम्यान नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी (भरती) प्रक्रिया* 

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि.21 : चंद्रपूर  जिल्हा होमगार्ड अंतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड  प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी 4 वाजतापासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखली  आयोजीत करण्यांत आली आहे. 

होमगार्डचा पदावधी कालावधी हा 3 वर्षाचा असून ही नोकरी नाही. 22 ते  24 ऑगस्ट रोजी सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांचाच होमगार्ड निवड  प्रक्रियेकरीता विचार केला जाईल. सकाळी 10 वाजता नंतर नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेकरीता प्रवेश दिला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
रहिवासी भागातील पथक/ उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार कागदपत्र पडताळणी  मध्ये अपात्र ठरतील. तसेच इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. 

नोंदणीबाबत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/loginl.phphttps://maharashtracdhg.gov.in/mahahg/loginl.php  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  22 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 6197 पर्यंत महिला उमेदवार, 23 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 2964 पर्यंत पुरुष उमेदवार 24 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक  2966 ते 6200 पर्यंत पुरुष उमेदवार घेण्यात येणार आहे.
नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचे निकष खालील प्रमाणे असतील. 
*आवश्यक कागदपत्रे* : 1) शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत (बोनाफाईड ग्राहय धरले जाणार नाही.) 2) रहिवासी दाखला 3) तहसीलदार यांचे कडील राशन कार्ड  4) आधार कार्ड 5) 2 पासपोर्ट साईज फोटो. 

उमेदवार वैद्यकीयदृष्टया पात्र असावा. पोलीस चारित्र्य अहवाल अनुकुल असावा. उमेदवार हे वेतनी सेवेत कार्यरत असतील तर  कार्यालयाचे अथवा मालकांचे संमती ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवारांस विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी देणे अनिवार्य आहे. उमेदवारांस नोंदणीचे वेळी तसेच उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर  करण्यांत येईल. तसेच खेळ, आय.टी.आय., जडवाहन चालक ड्रायव्हिंग लाइसन्स, एन.सी.सी. प्रमाणपत्र इ. असल्यास सोबत आणावे. नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारांना नोंदणी करीता स्व:खर्चाने यावे लागेल, असे जिल्हा समादेशक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Comments