वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*200 युनिट हवा मे आंदोलन*


*200 युनिट हवा मे आंदोलन*

*200 युनिट हवा मे आंदोलन*  विद्यमान आमदार साहेबांनी केलेल्या स्वाक्षरी अभियानाला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याच्या निषेधार्थ व फक्त मते मिळण्यासाठी चंद्रपूरकरांच्या भावनेशी खेडून जनतेची फसवणूक करण्यात आल्याच्या निषेधार्थ *दि:-03-08-2024 ला सकाळी 10 वाजता जेटपुरा गेट येथे*  *200 युनिट हवा मे* आंदोलनाचे आयोजन करण्यात आले *आंदोलन स्थळी गॅस चे फुगे उडवून व 200 युनिट हवा मे चे नारे देण्यात आले*. व सदर स्वाक्षरी अभियानाचे निषेध करण्यात आले होते प्रउत्ती फाऊंडेशन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिष माशिरकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडले .
आंदोलन स्थळी संस्थेच्या पदाधिकारी समवेत अनेक चंद्रपूरातील नागरिकांनी व युवकांनि आंदोलनात उपस्तिती दर्शवली. 

Comments