लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*कोळसा खाणीत डोझरने चिरडल्याने मेकॅनिकचा मृत्यू**वेकोली माजरी परिसरातील नागलोण-पाटाळा भाग 2 येथील कोळसा खाणीतील घटना*

*कोळसा खाणीत डोझरने चिरडल्याने मेकॅनिकचा मृत्यू*

*वेकोली माजरी परिसरातील नागलोण-पाटाळा भाग 2 येथील कोळसा खाणीतील घटना*

अतुल कोल्हे भद्रावती 
जाहिरात 
                  नागलोण-पाटाळा भाग 2 मध्ये खाजगी क्षेत्रातील ओव्हरबर्डन ट्रान्सपोर्टर वेकोली माजरी क्षेत्रांतर्गत माजरी खुली  कोळसा खाणितील असिस्टंट मेकॅनिक तोफान रवींद्र नायक वय 22 वर्षे रा. बेगुनिया पो.  पंचभूती जि. गंजाम (ओरिसा) याचा डोजर दुरूस्ती करीत असतांना डोजर मशीन खाली आल्याने मृत्यू झाला. हा एनसीसी कंपनीत कार्यरत होता. ही घटना मंगळवारी रात्री घडली.  व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागलोण-पाटाळा पार्ट 2 खुल्या कोळसा खाणीतील एनसीसी कंपनीच्या डोझर मशिनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी कंपनीत कार्यरत हेड मेकॅनिक सद्दाम हुसेन आणि सहाय्यक तोफान नायक हे दोघे काम करत होते. डोझर मशीनमध्ये इंजिन दुरुस्त करण्यासाठी डिझेल पुरवठा होत नव्हता, त्यानंतर मयत तुफान नायक याने पंपाला प्रेशर देण्यास सुरुवात केली असता, गीअरमध्ये असलेल्या डोजरने सहायक मेकॅनिकल तोफान नायकला तुडविले. त्यामुळे त्याच्या शरीराचे तुकडे झाले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वेकोली माजरी क्षेत्राचे महा प्रबंधक प्रमोद कुमार, सुरक्षा अधिकारी विकास अग्रवाल, उपप्रादेशिक व्यवस्थापक ए. अरुमुगम, खाण व्यवस्थापक मोहम्मद.  मदार व खासगी कंपनीचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचले.  माजरी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून एनसीसी खासगी कंपनीच्या व्यवस्थापनाने मृताच्या कुटुंबीयांना कळविले असून, कुटुंबीय आल्यानंतर त्यांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल व अंत्यसंस्काराचा खर्च इत्यादीसह मृतदेह ताब्यात दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.


  सहाय्यक मेकॅनिक तुफान नायक हे दुरुस्त करत असताना रात्रीच्या वेळी डोजरमध्ये बिघाड झाला असता, डिझेल पंपावर दबाव टाकत असताना अचानक इंजिनला डिझेल लागल्याने तुफानचा मृत्यू झाला. जागीच मृत्यू झाला.
 मो.मदार (खाण व्यवस्थापक) नागलों पाटला भाग-2 OCM

Comments