वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती** चिमूर प्रकल्प कार्यालयाचे अर्ज करण्याचे आवाहन*

*अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशात  शिक्षणासाठी शिष्यवृत्ती*

* चिमूर प्रकल्प कार्यालयाचे अर्ज करण्याचे आवाहन*

अतुल कोल्हे भद्रावती 

चंद्रपूर, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर या कार्यालयाच्या अतंर्गत  चिमुर,    ब्रम्हपरी, नागभीड, वरोरा व भद्रावती या तालुक्यांचा समावेश होतो. आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसुचित जमातीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर  पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी 7 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये कुटुंबाचे वार्षिक उत्पनांची कमाल मर्यादा 8 लक्ष रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्युएस वर्ल्ड रॅकींग 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील, अशा विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शासन निर्णयाच्या शर्ती व अटीच्या अधिन राहून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी प्रविण लाटकर यांनी कळविले आहे.

००००००


Comments