वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करा- खा. प्रतिभा धानोरकरलोकसभेतील पहिल्याच भाषणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सरकारला घेरले.

शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करा- खा. प्रतिभा धानोरकर
लोकसभेतील पहिल्याच भाषणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सरकारला घेरले.

चेतन लुतडे 

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जुलै पासून सुरुवात झाली असून लोकसभेत पहिल्यांदाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून बहूमतांनी निवडून गेलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार ला जाब विचारुन आपल्या पहिल्या भाषणाला सुरुवात केली.

वरोरा विधानसभेच्या आमदार पदाच्या काळात विविध आयुधांचा वापर करुन मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत शून्य तासात शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. खासदार धानोरकर म्हणाल्या कि, 2014 मध्ये उत्पन्न दुप्पट करुन देण्याचे वचन मोदी सरकार ने दिले. पण हे सरकार संपुर्ण अपयशी ठरले असून शेतकरी कुटूंबांची परिस्थिती भयावह असल्याचे देखील मत यावेळी व्यक्त केले. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हîात 444 तर यवतमाळ जिल्हîात 1641 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चंद्रपूर जिल्हîातील 444 शेतकऱ्यांपैकी 122 तर यवतमाळ जिल्हîातील 1641 पैकी 819 शेतकरी अपात्र ठरल्याचे आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हे सरकार पोकळ घोषणा करणारे असून फक्त आपल्या उद्योग मित्रांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांप्रती असणारी उदासिनता दुर करुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावे अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात केली.


Comments