1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन*

*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 22 :  सन 2023-24  या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामंध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उर्त्तीण झालेल्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2024 आहे.

सदर शिष्यवृत्तीकरीता पोटजात असलेले  मांग, मातंग, मिनिमादीग, मादींग, दानखनीमांग मागंमहाशी, मदारी, राधेमांग, मांगगारुडी, मांगगारोडी, मादगी, मादीगा या जातीतील विद्यार्थी विद्यार्थींनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

अर्ज भरण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे संपर्क करून मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत किंवा चंद्रपूर जिल्हा कार्यालयाच्या slasdcchandrapur@gmail.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.

*आवश्यक कागदपत्रे :* जातीचा दाखला, फोटो, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, राशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज.

००००००

*अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशात  शिक्षणासाठी शिष्यवृत्ती*

*Ø चिमूर प्रकल्प कार्यालयाचे अर्ज करण्याचे आवाहन*

चंद्रपूर, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर या कार्यालयाच्या अतंर्गत  चिमुर,    ब्रम्हपरी, नागभीड, वरोरा व भद्रावती या तालुक्यांचा समावेश होतो. आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसुचित जमातीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर  पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी 7 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये कुटुंबाचे वार्षिक उत्पनांची कमाल मर्यादा 8 लक्ष रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्युएस वर्ल्ड रॅकींग 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील, अशा विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शासन निर्णयाच्या शर्ती व अटीच्या अधिन राहून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी प्रविण लाटकर यांनी कळविले आहे.

००००००

Comments